चाकूचा धाक दाखविणारा भामटा पोलिसांच्या ताब्यात

0

जळगाव – दारूच्या नशेत चाकुचा धाक दाखवून एका दुकानादारास धमकावणार्‍या अट्टल गुन्हेगारावर एमआयडीसी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्याच्यावर यापूर्वी देखील गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. खुशाल बापु मराठे (वय 22, रा.रामेश्‍वर कॉलनी) असे अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. मराठे हा रविवारी सायंकाळी रामेश्‍वर कॉलनी परिसरात दारुच्या नशेत लोकांना चाकुचा धाक दाखवत होता. एका स्विटमार्टच्या दुकानमालकाकडे पैसे मागत होता. तो दहशत माजवत असताना काही नागरीकांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक नाना सुर्यवंशी, शरद भालेराव, गोविंदा पाटील, विजय बावस्कर यांच्या पथकाने रामेश्‍वर कॉलनीत जाऊन मराठेला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याची नशा उतरली. यानंतर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.