भुसावळ- दीनदयालनगरात राहण्यासाठी 20 हजार रुपये एकरकमी आणि दररोज 200 रूपये अशी खंडणी मागून चाकूचा धाक दाखवणार्यांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित शेख तस्लीम शेख सलीम उर्फ काल्या व ताराबाई शेख सलीम यांनी शेख सलीम शेख नासीर यांच्या घरात जबरीने शिरत त्यांना व त्यांच्या पत्नी आणि आईला शिवीगाळ करत चाकूचा धाक दाखवून खंडणी मागितली. त्यामुळे दोघांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय जोशी पुढील तपास करत आहेत.