चाकूच्या धाकावर लूट ; तिघे आरोपी जाळ्यात

0
भुसावळ- चाकू हल्ला करीत 20 हजारांची लूट करणार्‍या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगार तस्लीम काल्यासह अन्य दोघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. तक्रारदार अहमदखान उर्फ बबलू निजामखान (25, सुरभी कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर भुसावळ) हे दीनयाल नगरात रेल्वे रिझर्व्हेशन तिकीटाबाबत विचारणा करण्यासाठी जात असताना तस्लीम उर्फ काल्या सलीम शेख, त्याची आई ताराबाई व अन्य एका अनोळखीने चाकू हल्ला करीत तक्रारदाराकडील 19 हजार 980 रुपयांची रोकड हिसकावून पोबारा केला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तिघाही आरोपींना अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक निशीकांत जोशी, एएसआय आनदंसिग पाटील, विकास सातदीवे, युनूस शेख व संजय बिर्‍हाडे आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.