रावेर : रावेर तालुक्यातील पाडळा येथील माहेर असलेल्या 25 वर्षीय विवाहितेने चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरून दिड लाख रुपये न आणल्याने सासरच्यांनी छळ केला. या प्रकरणी रावेर पोलिसात पतीसह सासु व सासर्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वेळोवेळी फारकती घेण्याची धमकी संशयीत पतीने दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. विवाहितेच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस स्थानकात पती मुकर तडवी, सासरे नासीर तडवी, सासू ऐनूर तडवी (सर्व रा.पंचक, ता.चोपडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक सुनील वंजारी करीत आहेत.