पोलादपूर (शैलेश पालकर) | ह.भ.प.लक्ष्मण खेडेकर, कोंडीराम खेडेकर आणि डॉ. भाऊ शितकर या त्रयींनी गेल्या 25 वर्षांपासून तालुक्यातील असंख्य भाविकांना चारधाम यात्रा घडवून आणण्याचे पवित्र कार्य केल्यानेच पितळवाडी हे गांव सुवर्णवाडी असावे, असे आध्यात्मिक महत्व प्राप्त झाल्याचे गौरवोद्गार गुरूवर्य ह.भ.प. विठ्ठलआण्णा घाडगे यांनी पितळवाडी येथे व्यक्त केले.
तालुक्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत यंदाच्या चारधाम यात्रेकरूंनी पितळवाडी येथे भंडारा कार्यक्रमाचे आयोजन केले असता यावेळी मान्यवरांच्या मनोगतावेळी गुरूवर्य विठ्ठलआण्णा घाडगे बोलत होते. यानंतर सोमवती आमावस्येनिमित्त देवळे येथील श्रीमहाबळेश्वर मंदिरात अमरकंटक जलाभिषेक करण्यात आला. यावेळी ह.भ.प. महादेवमहाराज कळंबे, विठ्ठलगवई घाडगे, सुनील मेस्त्री, रमेश नरे, संतोष शेलार, गणपत साळवी, सखाराम गाडे, तुकाराम शिंदे, गोपीचंद कुंभार, नारायण सकपाळ, निवृत्ती मोरे आदींनी भजन किर्तनसेवा केली. यावेळी अनिल मालुसरे, ज्ञानोबा केसरकर, राजिपच्या सदस्या सुमन कुंभार,वैभव चांदे, एकनाथ गायकवाड, बापू जाधव, सुरेंद्र बांदल, सखाराम शिंदे, संजय मोदी, हरिभाऊ पवार, भरत चोरगे, नारायण चोरगे, सुभाष नरे, सुरेश साने, निवृत्ती घाडगे, निवृत्ती उतेकर, सुरेश साने, लक्ष्मण साने, चिमाजी शिंदे, सुनील जाधव, राजू उतेकर तसेच असंख्य मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अमरनाथ तसेच चारधाम यात्रा घडविणारे ह.भ.प.लक्ष्मण खेडेकर, कोंडीराम खेडेकर आणि डॉ. भाऊ शितकर या तिघांचाही गुरूवर्य विठ्ठलआण्णा घाडगे आणि ह.भ.प. महादेवमहाराज कळंबे यांच्याहस्ते शिवमूर्ती व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
चारधाम यात्रेला यंदा गेलेले भगवान साळवी, सचिन खेडेकर, संजय चोरगे, स्वप्नील उतेकर, विनायक केसरकर, डॉ.नाना शृंगारपुरे, निलेश खेडेकर, संतोष जाधव, पंढरीनाथ जाधव, स्वप्नील कुंभार, संदीप वरणकर आदी यात्रेकरूंतर्फे पितळवाडी विभागासह तालुक्यातील भाविकांसाठी सोमवती आमावस्या आणि श्रावण महिना समाप्तीनिमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असता परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थित राहून याचा लाभ घेतला.
या भागातील वयोज्येष्ठ ह.भ.प. महादेवमहाराज कळंबे यांनी हळदूळे आणि पितळवाडी येथेच का हरिभक्तांकडून इश्वरसेवा घडते याचे कारण येथे धर्माचरण करणाऱ्या व्यक्ती आहेत. आपलेपणा सोडू नका, आपला धर्म सोडू नका, इश्वरसेवा सोडू नका तर असे संतकार्य घडू शकेल. शिवछत्रपती, तुकोबाराया, निवृत्तीनाथ व माऊलींच्या कार्याची ही पोचपावती आजही आपणास पाहायला मिळत आहे. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगतातून ह.भ.प.लक्ष्मण खेडेकर, कोंडीराम खेडेकर आणि डॉ. भाऊ शितकर या तिघांचा विशेषत: लक्ष्मणबुवा खेडेकर यांचा गौरव केला.
यानंतर सोमवती आमावस्येनिमित्त चारधाम यात्रेतून अमरकंटक नदीच्या पाण्याचा अभिषेक देवळे येथील श्रीमहाबळेश्वर मंदिरामध्ये लक्ष्मणबुवा खेडेकर तसेच यात्रेकरूंच्याहस्ते करण्यात येऊन या श्रावणमास सोहळयाची समाप्ती करण्यात आली.