Mobile Lampas Of Students Of Agricultural School In Muktainagar मुक्ताईनगर : कृषी महाविद्यालयात शिक्षणासाठी आलेल्या तीन विद्यार्थ्यांचे खोलीतून अज्ञात भामट्याने 15 हजार रुपये किंमतीचे मोबाईल चोरट्यांनी लांबवले. शनिवार, 20 रोजी रात्री 11.30 ते रविवार, 21 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा ही घटना घडली.
खोलीतून लांबवले मोबाईल
तक्रारदार नरेंद्र संजय सोनवणे (22, शिवगंगा नगर, सोलापूर) हे त्यांच्या अन्य दोन मित्रांसह कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. शहरातील गजानन महाराज मंदिरामागे या विद्यार्थ्यांनी खोली (रूम) केली असून तिघे खोलीत झोपले असताना त्यांनी आपापले मोबाईल चार्जिंगला लावले असता चोरट्यांनी संधी साधून ते लांबवले. सोमवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक विनोद सोनवणे करीत आहेत.