चार चेंडूत 92 धावा देणारा गोलंदाज निलंबित!

0

ढाका । केवळ 4 चेंडूत तब्बल 92 धावा देऊन सामना मुद्दाम गमाविणार्‍या खेळाडूला 10 वर्षांसाठी बंदीची कारवाई बांग्लादेशने केली आहे. लालमाटिया क्लबचा खेळाडू सुजोन महमूद याला बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने खेळाला बदनाम केल्याच्या आरोपाखाली 10 वर्षासाठी क्रिकेटमधून निलंबित केले आहे.

या आश्चर्यजनक खेळाने क्रिकेटजगतात नवा लाजीरवाणा रेकॉर्ड झाला आहे मात्र याचमुळे त्या खेळाडूला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने बाहेरचा रस्ता दाखविला आहे. ढाका सेकेंड डिव्हिजन लीगमध्ये सहभाग घेण्यास लालमाटिया क्लब संघालाही अनिश्चितकाळासाठी बंदी घातली आहे, तर संघाचे प्रशिक्षक, कर्णधार व व्यवस्थापकांवर प्रत्येकी 5-5 वर्षांची बंदी घातली आहे. लालमाटिया क्लब संघ मागच्या महिन्यात 50 षटकांच्या सामन्यात केवळ 14 षटके खेळून फक्त 88 धावांत गारद झाला होता. एक्सिम क्रिकेटर्सने केवळ चार वैध चेंडूमध्ये एकही विकेट न गमवता 92 धावा केल्या.