जळगाव। जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद सुरूच असून, रविवारी एकाच दिवशी शहराच्या वेगवेगळ्या भागात या मोकाट कुत्र्यांनी चार जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. दरम्यान, या जखमींवर सिव्हील हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यात आले. महापालिका मात्र, मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताबाबत उदासीन असल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शहरासह जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांच्या चाव्याच्या घटना दिवसांगणिक वाढत आहेत.
कुत्र्यांचा चावा घेतल्याने जिल्हा रुग्णालयात चार जणांवर उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दिपक प्रकाश वाणी (वय 45 रा. देवेंद्रनगर), शहादू हिरामण नन्नवरे (वय 65 रा. पाळधी), सालार शेख मोहम्मद (वय 20 रा.मास्टर कॉलनी), मोहित जोशी (वय 17 रा. महाबळ) यांचा समावेश आहे. तर या जखमींवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र, शहरसह जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांनी धुमाकुळ घातला आहे. यामुळे नागरीक हैराण झाले आहेत.