चार दिवसांनी उघडले कोरपावली ग्रामपंचायतीचे कुलूप

0

यावल : विविध प्रकारच्या मागण्यांसाठी कोरपावली ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत सदस्य जलीलभाई पटेल यांच्यासह काही सदस्य व ग्रामस्थांनी चार दिवसांपूर्वी कुलूप ठोकले होते. समस्यांचा निपटारा करण्यासंदर्भात सकारात्मक आश्‍वासन दिल्यानंतर मंगळवारी दुपारी ग्रामपंचायतीचे कुलूप उघडण्यात आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला.

ग्रामसेवक प्रवीण सपकाळे, सरपंच अमिता नेहेते, माजी सरपंच महेंद्र नेहेते, बाजार समितीचे संचालक राकेश फेगर्ड, ईस्माईल तडवी, मेहबूब मेंबर आदींनी मध्यस्ती करून सर्व मागण्या मान्य केल्या. जलील पटेल, सरफराज तडवी, गफूर तडवी, उपसरपंच मनीषा तडवी आदींनी आक्रमक पवित्रा मागे घेत गावाच्या विकासासाठी सोबत राहण्याचे आश्‍वासन दिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.