मुंबई : ‘सिम्बा’ बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरतोय. हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २० कोटीहुन जास्त कमाई केली. आता चार दिवसांत चित्रपटाने 96.35 कोटींचा गल्ला जमावला आहे.
नववर्षात ‘सिम्बा’च्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. करण जोहर निर्मित आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ भारतासह जगभरात 4 हजार स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आला आहे.