माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला यश ; विकासकामे होणार
भुसावळ- भुसावळसह सावदा, रावेर, बोदवड चार पालिकांना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नातून विशेष रस्ता अनुदान म्हणून 11 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून मोठ्या प्रमाणावर विकासकामे करता येणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
निधीतून होणार विकासकामे
भुसावळ पालिकेला पाच कोटी, रावेरला एक कोटी तर सावदा दोन व बोदवड नगरपरीषदेला तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे तर सावदा येथे कब्रस्थानसाठी 60 लाख तसेच बोदवड येथे कब्रस्थानसाठी 40 लाख रुपये मिळून 11 कोटी 10 लाखांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. निधीबाबत खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार हरीभाऊ जावळे यांनी वेळोवेळी
शासनाकडे तसेच मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्याचे भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे कळवतात.