चार वर्षाच्या मुलावरील हृदय शस्त्रक्रिया यशस्वी

0

प्रवीण माने यांनी उचलली खर्चाची जबाबदारी; आठ दिवसातच झाली शस्त्रक्रिया

इंदापूर : इंदापुरात हालाखीचे जीवन जगत असलेल्या कुटुंबातील चार वर्षांच्या मुलाच्या हृदयला छिद्र होते. त्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी तीन लाखांचा खर्च येणार होता. हालाखीच्या परीस्थितीमुळे मुलाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. याबाबतची माहिती पुणे जिल्हापरिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने यांना समजताच त्यांनी उपचारांच्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी उचलली. आठ दिवसातच या मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

लायाप्पा कांबळे असे या मुलाचे नाव आहे. जन्मत:च त्याच्या हृदयाला छिद्र होते. लायाप्पा चार वर्षांचा झाला तरी हृदयाचे छिद्र भरून न निघाल्याने त्याला त्रास होऊ लागला होता. परंतु गरीबीची परिस्थिती असल्याने त्याचे पालक हतबल बनले होते. त्याच्या पालकांनी प्रविण माने यांची भेट घेऊन मदत मागितली. त्यावेळी माने यांनी क्षणाचाही विलंब न करता शस्त्रक्रियेची जबाबदारी स्वीकारली. खासदार सुळे यांच्या सहकार्याने मुंबईतील रहेजा हॉस्पिटलमध्ये संपूर्ण शस्त्रक्रिया मोफत करून दिली.