जळगाव। जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यातील संशयित चोरटा मुकेश युवराज भिल हा गेल्या चार वर्षांपासून फरार झाला होता. अखेर चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखा पथकाला धुळ्यातील कुसूंबा गावातून सापळा रचून जेरबंद केले आहे. दरम्यान, पूढील कारवाईसाठी चोरट्यास चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
चाळीसगाव पोलिसांच्या दिले ताब्यात
चोरीच्या गुन्ह्यातील संशयित चोरटा हा गेल्या चार वर्षांपासून फरार होता. तर पोलिस त्याच्या मागावर असतांना देखील तो मिळून येत नव्हता. चोरट्यास पकडण्यास पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखली स्थानिक गुन्हे शाखा विभागाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी पथक तयार करून चोरट्याच्या शोधार्थ धुळे येथे रवाना केले. दरम्यान, पथकाला संशयित चोरटा मुकेश युवराज भिल वय-22 हा धुळे येथील कुसूंबा गावातील बसस्थानकाजवळ असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पथकाने बसस्थानक परिसरात सापळा रचून मुकेश भिल याला ताब्यात घेतले. सदर कारवाई पथकातील पोहेकॉ. दिलीप येवले, रविंद्र पाटील, दिपक पाटील, युनूस शेख, नरेंद्र पाटील, संजय पाटील, संजय सपकाळे, विनोद पाटील, शशिकांत पाटील, अशोक चौधरी, विजय पाटील, विलास पाटील, दर्शना ढाकणे यांनी केली.