मुंबई : राज्य सरकारने बुधवारी चार सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. श्रीमती सिमा व्यास यांना हाफकीनच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून बदली करून महिला आणि बाल कल्याण आयोगाच्या सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त पदावर संपदा मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इंद्रा माल्लो याची नियुक्ती माविमच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून बाल विकास योजनेत आयुक्त पदावर करण्यात आली आहे. सिंधुदूर्गचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची नियुक्ती सुनिल चव्हाण यांची औरंगाबाद येथील जिल्हाधिकारीपदावर करण्यात आलेली बदली रद्द करून त्या जागी करण्यात आली आहे.