पालघर– खार्डी सफाळे या मार्गावरून जाणारी राज्य परिवहन विभागाची बस विहीरीत कोसळण्यापासून वाचली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
चालक माकूणसार येथे बस मागे घेत असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक विहिरीवर धडकली. बस धडकल्याची बाब लक्षात येताच चालकाने बस थांबवली. त्यामुळे सुदैवाने बस विहिरीत कोसळली नाही.
परंतु या प्रकरणामध्ये वाहक तेथे हजर होता की नाही याची चौकशीची मागणी माकूणसार ग्रामस्थांमधून होत आहे.