चालत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न पडला महागात

0

दादर: दादर रेल्वे स्थानकात चालत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न हे प्रवासीला चांगलेच महागात पडले आहे. चालू रेल्वेतून उतरतांना प्रवासी गंभीर जखमी झालाय. फलाट क्रमांक चारवर ही दुर्घटना घडली आहे.

हमीद जेवल असं या प्रवासी व्यकीचं नाव असून, तो मुळचा बांगलादेशचा आहे. हमीद जेवल गाडीतून पडताच फलाटावरील पोलीस शिपायी तापोळे यांनी तातडीनं त्यांना पकडलं. त्यामुळे हमीद यांचा जीव वाचला.