दापोडी – हॅरिस ब्रिजवरून चालत्या रेल्वेतून पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. शीतल सुमित लोहरे (वय 28, रा. आंबेडकर चौक, पडाळवस्ती, खडकी) असे नदीपात्रात पडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शीतल लोहरे रविवारी रात्री लोणावळा पुणे लोकलने प्रवास करत होती. लोकल हॅरिस ब्रिजवर आली असता. शीतल लोकलमधून नदीपात्रात पडली. पडण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, लोकलमधून नदीपात्रात पडल्याने तिचा मृत्यू झाला. संत तुकाराम नगर अग्निशमन विभागाच्या जवानांनी शोधकार्य करत शीतलचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. संत तुकाराम नगर अग्निशमन विभागाच्या लिडिंग फायरमन अशोक कानडे, फायरमन विवेक खंदेवाड, अमोल चिपळूणकर, विनेश वाटकरे, भूषण येवले, प्रदीप हिले आदींनी ही कारवाई केली.