चाळीसगावचे डाॅ.कपिलदेव सहदेव पाटील यांची मुंबई पोलिस सर्जनपदी नियुक्ती

# चाळीसगाव तालुक्याला लाभले पहिल्यांदाच एवढे मानाचे पद

चाळीसगाव : हिरापूर येथील रहिवाशी तथा तालुक्यातील वाघळी प्राथमिक आरोग्य केंद्रात काम पाहिलेले वैद्यकीय अधिकारी तथा सध्या वाशी ता उस्मानाबाद येथे कार्यरत वैद्यकीय अधिक्षक ( Medical Suprintendent ) डाॅ.कपिलदेव सहदेव पाटील यांची राज्य सरकारच्या मुंबई पोलिस सर्जन (पोलिस शल्य चिकित्सक- हे पद सिव्हील सर्जन समकक्ष आहे ) या पदी पदोन्नतीने नियुक्ती झाल्याने तालुक्यातून त्यांचेवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांनी MD व DNB (Forensic Medicine) यवतमाळ येथे केले असून संपुर्ण राज्यात अशा प्रकारेण दोन्ही पदव्या घेतलेले ते एकमेव वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यांचे वडिल सहदेव पाटील बँकेत कार्यरत होते, ते संघर्षमय परिस्थितीतून आले आहेत.