चाळीसगावचे डॉ.तुषार राठोड यांना बंजारा हिरा पुरस्कार

0

चाळीसगाव- बंजारा समाजातील तरुण पिढीला सामाजिक उपक्रम राबवून विविध संदेश देणार्‍या येथील स्टार फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. तुषार राठोड यांना नुकताच बंजारा हिरा पुरस्कार नाशिक येथे आयोजित एक दिवसीय सत्संग सोहळ्यात नाशिक प.पु कै.लक्ष्मण चैतण्य महाराज पाल यांचे शिष्य श्री. श्री. श्याम चैतंन्य बापुजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. चैतण्य परीवार व बंजारा सेवक परीवार यांच्या कडुन हा बंजारा हिरा पुरस्कार देण्यात येतो. समाजासाठी तळमळ असणार्‍या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. या वर्षी डॉ. तुषार राठोड यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक रविराज चव्हाण पांडुरंग जाधव, निलेश जाधव, संतोष राठोड,तुकाराम राठोड, साहेबराव राठोड, गुलाब पवार, रघुनाथ पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.