चाळीसगावचे माजी नगराध्यक्ष मधुआण्णा चौधरी यांच्या प्रकृतीची सुरेश जैन यांच्याकडून विचारपूस

0

चाळीसगाव- सदानंद हॉटेल उद्योग समूहाचे सर्वेसर्वा तथा नगरपरीषदेचे माजी नगराध्यक्ष मधुकर उखाजी चौधरी हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असून शहरातील डॉ.वाडेकर यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असुन आज माजी मंत्री सुरेश जैन यांनी दवाखान्यात भेट देऊन प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी जिल्हा परीषदेचे माजी सदस्य सुभाष चव्हाण, ज्येष्ठ नेते पद्माकर पाटील, बेलगंगेचे माजी संचालक बाळासाहेब पाटील, सुभाष जैन, सदानंद चौधरी हे उपस्थित होते. मधुकर चौधरी हे राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे पंचवीस वर्षे संचालक होते. तेली समाजाचे अध्यक्ष म्हणून समाज उन्नतीसाठी मोठी कारकीर्द आहे. गेले चाळीस वर्षे ते नगरपालिकेचे नगरसेवक होते. चाळीसगाव तेली समाज अध्यक्ष ते अखिल भारतीय तेली समाजाच्या दिल्ली कार्यकारिणीमध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. तालुक्याचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक विविध क्षेत्रासह त्यांचे योगदान मोठे असल्याची आठवण यावेळी सुरेश जैन यांनी काढली.