जळगाव : उद्योगधंद्यासाठी माहेरहून 10 लाख रूपये आणावे यासाठी चाळीसगावातील विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह आठ जणांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
साक्रीतील पतीसह संशयीतांविरोधात गुन्हा
चाळीसगाव शहरातील माहेर असलेल्या प्रियंका विनय थोरात (वय-28) यांचा विवाह धुळे जिल्ह्यातील साक्री येथील विनय शिवप्रसाद थोरात यांच्याशी रीतीरीवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती विनय थोरात याने विवाहितेला माहेरहून 10 लाख रूपये उद्योगधंद्यासाठी आणावे, अशी मागणी केली परंतु आई-वडीलांची परीस्थिती हालाखीची असल्याने पैश्यांची पूर्तता न झाल्याने पतीकडून सतत शिवीगाळ व मानसिक छळ सुरू झाला. हा छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या.
शहर पोलिसात गुन्हा
प्रियंका थोरात यांनी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने पती विनय थोरात, सासु सुनीता शिवप्रसाद थोरात, दीर प्रणव शिवप्रसाद थोरात, आजल सासू सुमित्रा भास्कर थोरात (सर्व रा.साक्री धुळे), आतेसासू पुष्पलता जगदीश विभांडीक (रा.महाबळ, ता.जि.जळगाव), आतेसासू अनिता उर्फ शोभा रविंद्र सराफ (रा.गांधी चौक, पाचोरा), आतेसासू प्रमोदिनी उर्फ छाया संजयशेठ पोतदार (रा.मुंबई), आतेसासू वैशाली भरत वानखेड (रा.जुने, धुळे) आणि पतीचा जवळचा मित्र राहुल हसमुखलाल जैयस्वाल (रा.साक्री) यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अनिल अहिरे करीत आहे.