चाळीसगावातील जुगारी शिक्षक पोलिसांच्या जाळ्यात

0

अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाची कारवाईने खळबळ

चाळीसगाव- तालुक्यातील टाकळी प्र.चा.येथे जुगाराचा अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने धाड टाकून पाच जुगार्‍यांना पकडले. अटकेतील आरोपींमध्ये चार शिक्षकांसह अन्य एकाचा समावेश आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. आरोपींच्या ताब्यातून 20 हजार 570 रुपयांच्या रोकडसह जुगाराची साधने जप्त करण्यात आली. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रबडे, नितीन आगोणे, संजय पाटील, नितीन वाल्हे, दत्ता मगर यांच्यासह पथकाने केली.

यांच्यावर झाली कारवाई
पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोतीलाल गबर पाटील (टाकळी प्र.चा.ग्रामपंचायतसमोर), कल्याणराव दिनकर पाटील (मालेगाव रोड, चाळीसगाव), जयवंत चैत्राम पवार (टाकळी प्र.चा.), रमेश हरी पाटील (टिळक नगर, (टाकळी प्र.चा.), राजेंद्र पंडित सोनजे (विवेकानगर, चाळीसगाव) असे अटकेतील आरोपींचे नावे आहेत.