चाळीसगावातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा

0

चाळीसगाव। चाळीसगाव शहरातील हिरापूर रोडवरील दुध डेअरी भागात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यावरुन चाळीसगाव शहर पोलीसांनी 30 एप्रिल 2017 रोजी रात्री 12-15 वाजता जुगार अड्यावर छापा मारुन 21 जुगार्‍यांना ताब्यात घेतले असुन त्यांचे जवळुन जुगार खेळण्याच्या साहीत्यासह 1 लाख 29 हजार 950 रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. 21 जणांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला मुंबई जुगार कायदा कलम 4 व 5 प्रमाणे कारवाई करुन त्यांना जामीनावर मुक्त करण्यात आले आहे.

हिरापूर रोडवरील दुध डेअरी भागात पोलिसांचा छापा
शहरातील हिरापूर रोडवरील दुध डेअरी भागात पोलीसांनी 30 एप्रिल रोजी रात्री 12-15 वाजेच्या सुमारास छापा मारला खेळतांना व खेळवितांना विकास किसन वाडेकर रा कन्नड, रमजानशाह आसीफशाह रा कन्नड, शाहबादखान शाह नवाज रा औरंगाबाद, अब्दुल करीम अब्दुल हकीम (44)रा औरंगाबाद, मोहन बळीराम पाचपोळ (52) रा जळगाव, रमेश वाल्मीक मांडोळे (45) रा चाळीसगाव, मिथुन हरिश्चंद्र चव्हाण (24) रा कन्नड, विष्णु देवचंद जाधव (33) रा कन्नड, अकलकखान अहमद मण्यार(46) रा मालेगाव, अनिल मदनलाल सदाशिव 52 रा औरंगाबाद, बाळासाहेब विलास कांबळे (46) रा नाळेगाव, अमोल कैलास बोरसे (29) रा साकुरा, किशोर कृष्णराव पाटील (60)रा चाळीसगाव, राजेंद्र फकीरा जमचे (50)रा मालेगाव, संजय दिनकर निकम (44) रा मनमाड, नजीम महमद अहमद (57) रा मालेगाव, हुकुमचंद अमरचंद जैन (60) रा कन्नड, अनिल देवसींग राजपूत (42) रा चाळीसगाव, भालचंद रामचंद्र पाटे (45) रा चाळीसगाव, मोहन रघुनाथ चौधरी (34) रा चाळीसगाव, अनिल अहमद मोहम्मद युनूस (42) रा रमजानपुरा मार्केट, यांना ताब्यात घेतले.