चाळीसगावातील दोघा भावंडावर चॉपर हल्ला

0

चाळीसगाव- शहरातील हुडको कॉलनी भागात दोघ भावंडांवर चॉपरने हल्ला केल्याची घटना 11 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौसिया चौक, कादरी नगर येथील रहिवासी मोहतस्सीम मुज्जमिल सैय्यद (वय 19) हा जेवनानंतर काल (ता. 11) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मित्र जहीर याकुब शेख याच्यासोबत बाहेर फिरण्यासाठी गेला होता. फिरत असताना शोएब शेख कादर उर्फ डिब्बर हा जवळ आला व जहीर शेख यास बोलला की तु, माझ्यासोबत चल त्यानंतर जहीर हा शोएब सोबत जात असताना त्याच्यासोबत मोहतस्सीम सैय्यद हा देखील जाऊ लागला त्यावेळी शोएब हा मोहसीम सैय्यद जवळ आला व बोलला की तु आमच्यासोबत येवू नको आम्हाला खाजगीमध्ये बोलायचे आहे असे बोलुन तो मोहतस्सीम यास शिवीगाळ व चापटाबुक्यांनी मारहाण करू लागला हे पाहुन माझ्या पाठीमागे फिरत असलेला माझा मोठा भाऊ मुदस्सीर तेथे आला व तो आमचे भांडण सोडवु लागला त्यानंतर शोएब शेख याचे दोघे मामा (पुर्ण नाव माहीत नाही) यांनी मुदस्सीर यास पकडूून ठेवले व शोएब शेख याने त्याच्या जवळील चॉपरने मुदस्सीर च्या पोटावर वार केला त्यावेळी मोतस्सीम हा सोडविण्यासाठी गेला असता त्याच्या देखील मांडीवर चॉपरने वार केल्याने त्यांना लागलीच नातेवाईकांनी शहरातील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहतस्सीम सैय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपींविरूद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.