Chalisgaon woman’s necklace worth one lakh stolen: Bhadgaon station Case भडगाव : भडगाव बसस्थानकावर आलेल्या चाळीसगावातील महिलेचा सुमारे 90 हजार रुपये किंमतीचा राणीहार चोरट्यांनी लांबवला. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गर्दीचा फायदा घेत केली चोरी
राजश्री गणेश राजपूत (37, पाटीलवाडा, चाळीसगाव) या कामानिमित्त भडगाव तालुक्यातील वाडे येथे आल्यानंतर शनिवार, 3 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सुमारास चाळीसगावी जाण्यासाठी निघाल्यानंतर भडगाव बसस्थानकावर आल्या असता चोरट्यांनी त्यांच्या कापडी बॅगमधून 90 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा राणीहार लांबवला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर राजश्री राजपूत यांनी भडगाव पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार विजय जाधव करीत आहे.