चाळीसगावातील लाचखोर फौजदारासह कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

0

जळगाव : तक्रारदाराकडे असलेल्या इसमांवर गांज्याची केस न करण्याच्या मागणीसाठी तडजोडीअंती आठ हजारांची लाच मागितल्याचे (डिमांड) सिद्ध झाल्याने चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार बापूराव फकीरा भोसले (52, रा.आमडदे, ता.भडगाव, ह.मु.कल्पतरू हॉस्पिटलजवळ, भडगाव रोड, चाळीसगाव) व पोलिस कॉन्स्टेबल गोपाल गोरख बेलदार (31, शेंदुर्णी दवाखान्यामागे, प्रभुकृष्ण नगर, शेंदुर्णी,ता.जामनेर, ह.मु.शाहु नगर, भडगाव रोड, चाळीसगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

यांनी केली कारवाई
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गोपाळ ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निलेश लोधी, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, सहाय्यक फौजदार रवींद्र माळी, हवालदार सुनील पाटील, हवालदार सुरेश पाटील, नाईक मनोज जोशी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.