चाळीसगावातून पशूधनाची चोरी : शहर पोलिसात गुन्हा

चाळीसगाव : शहरातील पाटणादेवी रोडलगत असलेल्या शेतातून चोरट्यांनी दोन बैलांसह गायीची चोरी केली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पशूधन चोरट्यांची टोळी सक्रिय
विठ्ठल भागवत आगोणे (35, रा. धनगर गल्ली, पाटणादेवी रोड चाळीसगाव) यांनी शनिवारी रात्री 11 वाजता पशूधनाला चारापाणी केले मात्र मध्यरात्री चोरट्यांनी पशूधन लांबवले. 66 हजार रुपये किंमतीचे दोन बैल आणि दोन गायी चोरट्यांनी लांबवल्या. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार अभिमन पाटील करीत आहे.