चाळीसगाव : शहरात दुचाकी चोरीचे सत्र कायम असून मजुराची घरासमोरून दुचाकी लांबवण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. या शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
घरासमोरून लांबवली दुचाकी
चाळीसगाव शहरातील वामन नगरातील सुनील सुधाकर बागुल (45) हे मजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कामासाठी त्यांच्याकडे दुचाकी (क्र एम.एच.19 डी.पी.2888) असून घराबाहेरून ती चोरट्यांनी लांबवली.
3 मार्च रोजी रात्री 10 ते 4 मार्चच्या पहाटे सहादरम्यान ही घटना घडली. 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेल्याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलिस नाईक भूषण पाटील करीत आहे.