चाळीसगाव । शहरातील लक्ष्मी नगरातील राजपुत मंगलकार्यालयाजवळुन शिक्षकाची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने 17 फेब्रुवारी 2018 रोजी सायंकाळी 7.30 ते 8.30 वाजेच्या दरम्यान चोरुन नेली असुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील पोतदार शाळेजवळील रहीवासी व चाळीसगाव येथील राष्ट्रीय अंधशाळेचे शिक्षक महेश मधुकर शिंदे (36) यांची मुलगी स्वरा शिंदे हिचा येथील राजपुत मंगल कार्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम असल्याने महेश शिंदे त्यांची 30 हजार रुपये किमतीची हिरो होंडा क्र.(एमएच 19 एटी 1900) या मोटारसायकल वर 17 फेब्रुवारी 2018 रोजी सायंकाळी 7.30 वाजता तेथे गेले व त्यांची मोटारसायकल मंगलकार्यालयाच्या भिंतीला लावुन आत कार्यक्रमस्थळी गेले होते. रात्री 8.30 वाजता कार्यक्रम संपल्यावर बाहेर आले असता 7.30 ते 8.30 वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची मोटारसायकल चोरुन नेली याप्रकरणी 23 फेब्रुवारी 2018 रोजी महेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो.नि.रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक योगेश मांडोळे करीत आहेत.