चाळीसगावात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

0

चाळीसगाव- तालुक्यात सर्वत्र वाळुबंदी असताना अवैध वाळु वाहतुक वाहतुक करीत असताना पोस्टल कॉलनी परिसरात नायब तहसीलदार विशाल सोनवणे, तलाठी दिनेश येडे, मनोज शिरसाठ, मंडळ अधिकारी एस. पी. बच्छाव यांनी ट्रॅक्टर क्रमांक (एमएच 19 एबी 7593) यावरील चालकाला थांबवुन वाळुबाबत विचारणा केली असता त्याने कुठलेही उत्तर न देता ठिकाणाहुन पळ काढला. हे ट्रॅक्टर महसुल पथकाने पोलीस कवायत मैदानात जमा केले असुन संबंधित ट्रॅक्टर नंबरवरून हे ट्रॅक्टर कोणाचे याचा तपास घेणे सुरू केले आहे. यावरून संबंधितावर कारवाई केली जाईल, असे महसुलच्या अधिकार्‍यांनी सांगितले.