राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांचा तहसीलदारांना निवेदन
चाळीसगाव – मुंबई येथील घाटकोपर येथे दहीहंडीच्या दिवशी जमलेल्या युवकांशी संवाद साधत असताना भाजपाचे आमदार राम कदम यांचा बोलतांना ताबा सुटला होता. आमदार राम कदम यांनी बेताल वक्तव्य करुन मुलींच्या भावनांचा अनादर केला आहे. ककएखाद्या मुलीला प्रपोज केले असता ती नाही म्हणत असेल तर तुमच्या आई वडिलांना समोर आणा व त्यांचा नकार असला तर तिला पळवून आणा असे वक्तव्य राम कदम यांनी केले असून भाजपाचे आमदार राम कदम यांनी महिलांबाबत केलेले वक्तव्य चुकीचे आणि वादग्रस्त आहे. याचा राष्ट्रवादी महिला, युवती व युवक कॉंग्रेस पक्षाच्यावतीने आज ५ रोजी जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी महिला तालुकाध्यक्षा सोनल साळुंखे, प्रतिभा पाटील, युवती अध्यक्षा हेमांगी शर्मा, प्रतिक्षा पाटील, अनिता शर्मा, युवक जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, शहराध्यक्ष अमोल चौधरी, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, अजय पाटील, आकाश पोळ, योगेश पाटील, यज्ञेश बाविस्कर, भाऊसाहेब पाटील, मनोज पाटील, गुंजन मोटे, स्वप्नील कोतकर, सुजित पाटील, पिनू सोनवणे, अनिकेत चव्हाण, पंजाब देशमुख, शरद मोरे आदी उपस्थित होते.