चाळीसगावात एक दिवसीय महाविद्यालय बंद आंदोलन

0

चाळीसगाव । नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करणे, 2012 पासूनच्या शिक्षकांना नियुक्ती मान्यता आणि वेतन देणे, आदी मागण्यांसाठी चाळीसगाव तालुका कनिष्ठ महाविद्यालय संघटनेच्या वतीने आज 2 फेब्रुवारी रोजी येथील धुळे रोडस्थित महाविद्यालयात एकदिवसीय कनिष्ठ महाविद्यालय बंद आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास बारावीच्या लेखी परिक्षांवर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती चाळीसगाव संघटनेचे अध्यक्ष प्रा.अविनाश पाटील यांनी दिली आहे.

अन्यथा परीक्षेच्या काळात बहिष्कार
1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करणे, माहिती तंत्रज्ञान शिक्षकांना अनुदान द्यावे, 2003 ते 2010-11 पर्यंतच्या वाढीव पदांवरील शिक्षकांना नियुक्ती मान्यता आणि वेतन द्यावे, सातवा वेतन आयोग तातडीने लागू करावा या मागण्या असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे अनेक प्रश्‍न सोडविण्यासाठी वेळोवेळी आश्‍वासन देऊनही ते सुटले नाहीत. शासनाने तातडीने मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत आदेश न काढल्यास 12 वी बोर्ड परीक्षेच्या काळात बहिष्कार आंदोलन करण्यात येईल. त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाचीच असेल असा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेतर्फे आला आहे. या आंदोलनात चाळीसगाव येथील प्रा.एस.पी.भिंगारे, वाय.एच.गुजराथी, बी.आर.येवले, ए.आर.मगर, डी.व्ही.चव्हाण, आर.के.घेटे, के.एन.पाटील, एस.बी.कुमावत, आर.एस.पाटील, एस.जे.सुर्यवंशी, एस.एस.पाटील, प्रा.ए.एस.पाटील, जे.एम.बोरसे, एस.जी.मराठे, व्ही.एन.पाटील सहभागी झाले होते.