चाळीसगावात झालेल्या ‘त्या’ खुनातील आरोपींना अटक करा

0

चाळीसगाव। चा ळीसगाव शहरातील शाह बिरादरीचे कार्यकर्ते मुन्ना शाह गुलाब शाह यांचा 14 ते 15 गुंडानी कट रचून 26 मे 2017 रोजी खून केला या कटातील 14 ते 15 आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अन्यथा शाह बिरादरीच्या वतीने जिल्ह्यातील तहसील, प्रांत आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी पोलिस स्टेशनच्या आवारात मोठ्या प्रमाणावर नातेवाईकांना ठिय्या आंदोलन करत गर्दी जमली होती.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा 
चाळीसगाव येथील पोलिस निरिक्षक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 26 मे 2017 रोजी भरदिवसा बिरादरीचे कार्यकर्ते मुन्ना शाह गुलाब शाह यांचा इम्तियाज मिर्झा, नासिर मिर्झा, इम्रान मिर्झा, कामरान मिर्झा, हुसेन मिर्झा अमजद मिर्झा, हर्षल जैस्वाल, भूषण धोबी, चिंटू जैस्वाल, सनी जैस्वाल, फिरोज मिर्झा, नईम शाह, असिफ मिर्झा, मोहसीन सय्यद या 14 ते 15 आरोपींची त्यांचा खून करून फरार झाले. खून करतांना प्रत्येक्ष दर्शिनी पहिले आहे. असे असतांना देखील आरोपीना अटक करण्यास पोलीस खाते अपयशी ठरले आहे. मयताच्या नातेवाईकांची तक्रार घेण्यास सुद्धा पोलिसांनी नकार दिला होता. कायद्याचे भय आरोपींमध्ये नाही. सर्व आरोपींना आणि हत्या करण्यामागे असणारे इसम राजकीय पुढार्‍यांना व हत्येचा कट रचण्यामध्ये सामील असलेल्या लोकांची सुद्धा चौकशी व्हावी.

नातेवाईकांनी घेतला पवित्रा
या हत्येमागे कट कारस्थान व मास्टरमाईंड आरोपींना अटक करून कलम 302 अन्वये गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. आमच्या मागणीवर 15 दिवसात कारवाई न झाल्यास अंजुमन मुस्लिम शाह बिरादरीच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देते वेळी शाह बिरादरीचे अनेक महिला पुरुष शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.