चाळीसगावात पोलीसांचा तीन ठिकाणी छापा

0

चाळीसगाव । शहरातील मालेगाव बायपास रोडवरील हॉटेल किनारा जवळ, इंदिरा नगर झोपडपट्टी शाळा नंबर 11, नागद रोड अशा तीन मद्यविक्री ठिकाणी चाळीसगाव शहर पोलिसांनी छापा टाकुन धडक कारवाई केली. यात आरोपीस मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपींन अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र रसेडे, पोलीस नाईक ओंकार सुतार, गोपाळ बेलदार, नितीन पाटील, संदीप भोई यांच्या पथकाने रविवारी 11 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास छापा मारला. अंदाजे 21 हजार रुपये किंमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.

इंदिरा नगर झोपडपट्टीत देशी विदेशी दारू विक्री करणारा भटू विजय लोंढे यास ताब्यात घेऊन 7 हजार रुपयाचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. दुसर्‍या कारवाईत मालेगाव रोड वरील हॉटेल किनारा येथ हर्षल शिवराम कोळी यास ताब्यात घेतले असून त्याचाकडून 13 हजार 865 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. तिसर्‍या कारवाईत नागद रोडवरील अवैध दारू विक्री करतांना मंगेश रामदास शेलार यास ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस कॉन्स्टेबल नितीन पाटील व गोपाळ बेलदार यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे. तपास हवालदार बापू भोसले व पोलीस नाईक योगेश मांडले, पोलीस नाईक अरुण पाटील करीत आहेत.