चाळीसगाव । बहुचर्चित दशक्रिया चित्रपट चाळीसगावमध्ये दाखविण्यात यावा या मागणीसाठी संभाजी सेना, बहुजन मुक्ती पार्टी, भारत मुक्ती मोर्चा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की बहुजन समाज अनेक वर्षांपासून अनिष्ट रूढी परंपरा कर्मकांडे यात गुरफटून अडकून पडला आहे कर्जबाजारी होऊन का होईना पण भीतीपोटी बहुजन हे सर्व कर्मकांडे करतात. निर्माते संजय पाटील यांनी दशक्रिया च्या माध्यमातून या सर्वांमागील वास्तव समजा समोर मांडले आहे आणि म्हणूनच जास्तीत जास्त बहुजनांनी हा चित्रपट पहावा असे आवाहन निवेदनातुन केले आहे.
निवेदनावर यांच्या स्वाक्षर्या: निवेदनावर अविनाश काकडे दिवाकर महाले ज्ञानेश्वर पगारे संदीप जाधव भूषण पाटील रवींद्र शिनकर मुकेश नेतकर महेंद्र सुर्यवंशी बंटी पाटील नितीन पवार भूषण पवार सुरेन्द्र महाजन प्रवीण पाटील विजय गवळी मोहसीन शेख मनोहर दुसने इम्रान शेख आदी संभाजी सेना बहुजन मुक्ती पार्टी भरत मुक्ती पार्टीच्या करकर्त्यांच्या सह्या आहेत.