मराठा समाजासाठी बलिदान देणार्या हुतात्म्यांना अभिवादन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार
चाळीसगाव- कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायदेशीररीत्या मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा सरकारचे आभार मानण्यासाठी गुरूवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने फटाके फोडून व ढोल-ताश्यांच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला. चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, तहसील कचेरी व पंचायत समिती कार्यालयाजवळ भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. पंचायत समिती कार्यालय येथे झालेल्या सभेत सभापतीपती दिनेश बोरसे, सरचिटणीस प्रा.सुनील निकम, रयत सेनेचे अध्यक्ष गणेश पवार, समाधान पाटील यांनी आपल्या मनोगातून मराठा आरक्षणासाठी बलिदान देणार्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले तसेच मराठा आरक्षणाचा आजवरचा संघर्ष मांडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले पराकोटीचे प्रयत्न याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, सभापती दिनेश बोरसे, जि.प.सदस्य भाऊसाहेब जाधव, सरचिटणीस प्रा.सुनील निकम, अनिल नागरे, धनंजय मांडोळे, शहर सरचिटणीस आड प्रशांत पालवे, अमोल नानकर, नगरसेवक सोमसिंग आबा, भिकन पवार, बापू अहिरे, रयत सेनेचे अध्यक्ष गणेश पवार, भैय्यासाहेब पाटील, माजी प स सदस्य रवी चौधरी, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, संभाजी घुले, समाधान पाटील, जितु वाघ, अनुसूचित जाती आघाडीचे स्वप्नील मोरे, अभिषेक मोरे, बंडू पगार, युवा मोर्चाचे मनोज पाटील, शुभम पाटील, बबडी शेख, योगेश गव्हाणे, संजय पाटील, बाजीराव अहिरे, रणजीत देशमुख, शेख सर, दरेगाव येथील जितेंद्र पाटील, गिरीष पाटील, प्रमोद पाटील, नेताजी पाटील, धामणगाव सुनील पवार, दहिवद नवल पवार, कल्याण खलाणे, लोंढे नरेंद्र काका, भगवान निकम, संजू जाट, आबा सावळे, चिंचगव्हाण सरपंच सुभाष राठोड, विनोद (भोला) पाटील, ढोमणे येथील भाऊसाहेब पाटील, प्रा शामकांत निकम, अजय वाणी, तरवाडे सुनील घोरसे, हिरापूर येथील संता निकुंभ, सुनील रणदिवे, अमित सुराणा, इम्रान शेख, ब्राम्हणशेवगे रत्नाकर पाटील, शिवा मराठे, शिदवाडी राहुल पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.