सिग्नल चौकात आंदोलकांनी मांडला ठिय्या : पोलिसांचा चोख बंदोबस्त
चाळीसगाव- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कायगावच्या गोदावरी पुलावरून काकासाहेब शिंदे (28) या तरुणाने उडी घेतल्यानंतर शासन या घटनेला जवाबदार असल्याचे धरत मंगळवारी चाळीसगाव बंदची हाक देण्यात आल्यानंतर व्यापार्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी शहरातील वर्दळीच्या सिग्नल चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले असून वाहतूक ठप्प झाली आहे. पोलीस प्रशासनाने सतर्कता म्हणून सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, बंदमध्ये शहरातील शाळा, महाविद्यालये, भाजीपाला व्यावसायीक तसेच दवाखाने आदी अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.