चाळीसगावात मेडिकल दुकान फोडले : पावणेसात लाखांचा ऐवज लंपास

भुसावळ/जळगाव : चाळीसगाव शहरातील गणेश रोडवरील द्वारका मेडिकलमध्ये चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याचा प्रकार बुधवारी पहाटे उघडकीस आला. चोरट्यांनी एकूण पावणेसात लाखांचा मुद्देमाल लांबवला असून या प्रकरणी याप्रकरणी मेडिकल दुकानदार राजरत्न सुधाकर पाटील यांच्या फिर्यादीनुसार चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

वर्दळीच्या रस्त्यावर धाडसी चोरी
वर्दळीच्या गणेश रोडवर द्वारका मेडिकल असून चोरट्यांनी छताचा लोखंडी पत्रा उचकाचून दुकानात प्रवेश केला व सहा लाखांची रोकड व 80 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत असा सुमारे 6 लाख 80 हजार रूपयांचा ऐवज लांबवला. बुधवार, 16 रोजी हा प्रकार उघडकीस आली. चोरटे दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. दरम्यान, चोरीस गेलेल्या ऐवजापैकी सहा लाख रूपये हे कापूस विक्रीतून आले होते व दोन दिवसापूर्वीच ते पैसे दुकानातील कपाटात ठेवण्यात आले होते, अशी माहिती आहे. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होत परंतु ते तेथेच घुटमळले.