शहर पोलीसांची अजुन एक कामगिरी
चाळीसगाव – चार दिवस आगोदर १३ मोटारसायकलसह आरोपीस अटक केल्यानंतर पुन्हा चाळीसगाव तहसिल कार्यालयाच्या गेटच्या बाजुला लावलेली मोटारसायकल चोरणारा आरोपीला २४ तासातच चाळीसगाव शहर पोलीसांनी मोटारसायकलसह मालेगाव येथुन अटक केली आहे त्याच्याकडुन अजुन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील पातोंडा येथील रघुनाथ हरी चौधरी यांची हे ८ जानेवारी २०१९ रोजी चाळीसगाव तहसिल कार्यालयात दुपारी २.३० वाजेच्या सुमारास कामानिमित्त आले होते. तहसिल कार्यालयाच्या गेटच्या बाजुला त्यांची २० हजार रुपये बजाज डिस्कव्हर (एमएच १९ बीएच ५५१०) लावुन ते कार्यालयात गेले व कामकाज आटोपुन ४.३० वाजेच्या सुमारास परत आले असता त्यादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची मोटारसायकल चोरुन नेली होती.
पोलीसांनी रचला सापळा
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दिल्यावर पोनि रामेश्वर गाडे पाटील व अधिकारी, कर्मचारी यांनी तपासाची चक्रे फिरवली. मोटारसायकलसह एक संशयीत तरूण मालेगाव येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बछाव, डीवायएसपी नजीर शेख, पोनि रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि राजेश घोळवे, हवालदार बापुराव भोसले, पोलीस नाईक विजय शिंदे, नितीन पाटील, राहुल पाटील, गोपाल बेलदार, पो कॉ राहुल गुंजाळ, प्रवीण सपकाळे, गोवर्धन बोरसे यांनी आरोपी रमेश बाळु मोरे (वय-२४) रा. वाघळी ता. चाळीसगाव यास वरील मोटारसायकलसह मालेगाव येथुन ९ जानेवारी रोजी अटक केली आहे. त्याचेकडुन मोटारसायकलचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी वर्तवली आहे. याप्रकरणी रघुनाथ चौधरी यांच्या फिर्यादीवरुन मोटारसायकल चोर रमेश बाळु मोरे याचेवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोलीस नाईक नितीन पाटील करीत आहेत.