चाळीसगाव । पेट्रोल, डिझेल व गॅस दरात वाढ करुन जनतेच्या भावनेशी खेळ खेळणार्या केंद्र व राज्य सरकारचा निषेध करीत चाळीसगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दुचाकी वाहनांना ढकलत नेत ‘धक्का मार आंदोलन’ करण्यात आले. शासकीय विश्रामगृहापासून ते तहसील आवारापर्यंत दुचाकी तसेच बैलगाडीच्या साहाय्याने ट्रॅक्टर व चारचाकी वाहने ओढण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिना’चे स्वप्न दाखवून जनतेच्या खिशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रवृत्तीच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक राजीव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन रोडपासून मोर्चाला सुरुवात झाली. सिग्नल पॉइंट मार्गे मोर्चा तहसील कचेरी चौकात आला. याठिकाणी ‘मोदी हटाव देश बचाव’, ’भाजप सरकार हाय हाय’, ‘चले जाव चले जाव’, ‘जनतेची फसवणूक करणार्या भाजपा सरकारचा धिक्कार असो’ आदी घोषणांनी चौक दणाणून सोडला.
सौ गधो में एक घोडा हुशार- माजी प्राचार्य साळुंखे
विरोधी पक्षात असतांना गॅस डिझेल पेट्रोलच्या किंमतीवर भरभरून बोलणारे सत्तेत आल्यावर मौनी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेल महाग झाल्याचा बनाव करणार्या ढोंगी राज्यकर्त्यांनी केंद्राचा व राज्याचा वेगवेगळा कर लावल्याने जनतेवर भाववाढीचा भुर्दंड लादला जातो आहे. यावेळी त्यांनी शंभर गाढवामध्ये एक घोडा हुशार ही कथा सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध केला व शासनाने केलेल्या जाचक अटी संदर्भात शेतकरी आणि व्यापारी बांधव कसा होरपळून निघाला आहे, अशी तीव्र शब्दात टीका करीत राज्य शासनावर शरसंधान साधले.
आंदोलनात कार्यकर्त्यांनी ढकलत आणली वाहने
‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून मोदी सरकारने जनतेची शुद्ध फसवणूक केली आहे.जनतेच्या नावाखाली भांडवलदारांचे हित जोपासले जात आहे.जीवनावश्यक वस्तुच्या दरात वाढ करून सर्वसामान्यांचे जीवन जगणे असह्य केले आहे.शेजारील राज्यात पेट्रोल,डिझेल व गॅसचे दर अत्यंत कमी असताना महाराष्ट्रात ते अधिक आहेत.यातून केवळ सर्वसामान्यांना त्रास होत आहे.त्यामुळे महागाईने होरपळत असलेली जनता आता जनता सुज्ञ झाली असल्याचे सांगून सरकार ने तातडीने भाववाढ कमी करावी अन्यथा यापेक्षाही त्रिव स्वरूपात आंदोलन करण्यात येईल अशी भावना राजीवदादा देशमुख यांनी व्यक्त केली
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
जिल्हा दुध संघाचे संचालक व राष्ट्रवादीचे युवा नेते प्रमोद पाटील यांनीही मोदी व भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. नोटाबंदी व जीएसटीच्या माध्यमातून देशाचा विकास होण्याच्या वल्गना फोल ठरल्या आहेत, तसेच रासायनिक खतांचे भाव कमी करण्यात यावेत तसेच दुधास भाव वाढ मिळावी, असे ते म्हणाले तर तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांनी भांडवलदारांचे खिसे भरण्यासाठी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावत असलेल्या सरकारला येत्या काळात जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन केले. जळगाव जि.प.गटनेते शशिकांत साळुंखे यांनी केंद्र आणि राज्य शासन शेतकर्यांच्या बाबतीत उदासिन असून शासनाने सामान्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याने शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले गेले असल्याचे मत व्यक्त केले.
आंदोलनात यांनी घेतला सहभाग
आंदोलनात जिल्हा परिषद गटनेते शशिकांत साळुंखे, जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, जि.प.सद्स्य अतुल देशमुख, भूषण पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, जेष्ठ नेते जालम पाटील, मंगेश पाटील, भगवान पाटील, रामचंद्र जाधव, सूर्यकांत ठाकूर, दिपक पाटील, ईश्वरसिंग ठाकरे, पं.स.गटनेते अजय पाटील, राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा जलसाक्षर अभियानाचे प्रमुख स्वप्नील कोतकर, भूषण ब्रांम्हणकार, सुनील पाटील, प्रा.डी.ओ.पाटील, सुभाष जैन, सदानंद चौधरी, कल्याण पाटील, मिलिंद जाधव, सदाशिव गवळी, साईनाथ देवरे, भैय्यासाहेब पाटील, अमोल चौधरी, राजेंद्र मोरे, यशवंत पाटील, देवा राजपूत, सुजित पाटील, शुभम पवार, यज्ञेश बाविस्कर, रावसाहेब सोनवणे, शेनफडू पाटील, अजय पाटील, सुनील पाटील, प्रा.डी.ओ.पाटील, सुभाष जैन, सदानंद चौधरी, प्रदीप पाटील, खुशाल पाटील, विनोद राठोड, निखिल देशमुख, वाल्मिक पाटील तसेच पदाधिकारी उपस्थित होते.