चाळीसगावात लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होणार

0

नगरपरिषदेच्या विशेष सभेत मंजुरी

चाळीसगाव – येथील नगरपरिषदेच्या वतीने शहरातील सिग्नल चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा ठराव यापूर्वीच मंजूर करण्यात आला होता, मात्र महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 2 मे 2017 मार्गदर्शक तत्वानुसार राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींचा पुतळा परवानगी मिळण्यासाठी नव्याने ठराव घेण्यासाठी आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात हा विषय सर्वानुमते बहुमताने एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहरात सिग्नल चौकातील स्टेशन रोड ते धुळे रोड यांच्यामध्ये त्रिकोणी जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 2 मे 2017 च्या पुतळा धोरण राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांच्या पुतळा उभारण्यास परवानगी देण्यासाठी विहित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करणे बाबत विचार विनिमय करण्यासाठी आज विशेष सभा बोलविण्यात आली होती.

सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा आशालता चव्हाण व उपनगराध्यक्ष आशाबाई चव्हाण तसेच मुख्य अधिकारी अनिकेत मानोरकर उपस्थिती होते.

पाच मिनिटात विषय मंजूर
सभेच्या सुरुवातीला या विषयासंदर्भात कोणाला काही म्हणायचे नाही हा विषय आधी मंजूर झालेला आहे, त्यामुळे नव्याने देखील ताबडतोब मंजूर करावा अशी भूमिका माजी आमदार राजीव देशमुख यांनी मांडली. त्यांतर सर्वानुमते विषय मंजूर करण्यात आले.

भाजप शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, सत्ताधारी गटाचे नेते राजेंद्र चौधरी, नगरसेवक चंद्रकांत तायडे, ज्येष्ठ नगरसेवक आण्णा चिंधा कोळी आदींनी सूचना मांडल्या.

सभेच्या सुरुवातीला लोकनियुक्त नगराध्यक्ष अशालाता विश्वास चव्हाण यांनी येत्या 3 सप्टेंबर रोजी नगरपरिषदेच्या शताब्दी महोत्सवाला सुरुवात होत असून यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहे, या कार्यक्रमाला सर्वच नगरसेवकांनी हजर रहावे व सहकार्य करावे तसेच शहरवासीयांना या महोत्सवात सहभगी व्हावे असे आवाहन केले.

माजी आमदार राजीव देशमुख, नगरसेवक घृ्णेश्वर पाटील, संजय रतनसिंग पाटील, मानसिंग राजपूत, चिराग शेख, शेखर बजाज, आनंद खरात, चंद्रकांत तायडे, अरुण आहिरे, विजया प्रकाश पवार, विजय भिकन पवार, वैशाली महेंद्र मोरे, वैशाली सोंमसिंग राजपूत, झेलाबाई पाटील, नगरसेवक सुरेश स्वार, अण्णा कोळी, शेखर देशमुख, रामचंद्र जाधव, दीपक पाटील, सविताताई राजपूत, योगिनी ब्राह्मणकर, रंजनाबाई सोनवणे, मनिषा देशमुख, अलका सदाशिव गवळी यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

सभेच्या विषयाचे वाचन लिपिक दीपक देशमुख यांनी केले तर मुख्याधिकारी अनिकेत मानकर यांनी आभार मानले. नगरपरिषदेचे मुख्य अभियंता राजेंद्र पाटील, अभियंता विजय पाटील, अभियंता दिगंबर वाघ, सूर्यवंशी आरोग्य निरीक्षक दिलीप चौधरी, आरोग्य अधिकारी तुषार नकवाल, कार्यालय अधीक्षक विजय खरात व पालिकेचे कर्मचारी अधिकारी यांनी परिश्रम घेतले.