शंभर किलो मिठाई दिवाळीत गोरगरीब जनतेला भेट
चाळीसगाव- वसुंधरा फाउंडेशनतर्फे दिवाळीनिमित्त व बुधवारी असलेल्या लक्ष्मी पूजनाचे औचित्य साधून चाळीसगाव रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड, सरकारी दवाखाना तसेच स्टेशन रोडवरील अनेक भागातील गोरगरीब, निराधार, अपंग व्यक्तींना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. यावेळी रेल्वे स्टेशनवर रेल्वे चालक व गार्ड यांनी मिठाई आनंदाने स्विकारली. दरवर्षी वसुंधरा फाउंडेशनतर्फे दिवाळी सर्वांची व सर्वांसाठी उपक्रम अंतर्गत मोफत दिवाळी फराळ वाटप करण्यात येते आणि या वर्षी सुध्दा या उपक्रमाअंतर्गत नगर पालिका मराठी शाळा व शहरातील गरजवंताना जवळपास शंभर किलो मिठाई व फराळ वाटप करण्यात आला. संस्थेमार्फत अध्यक्ष धरती सचिन पवार, गजानन मोरे, धर्मराज खैरनार, शुभम देशमुख, देवेन पाटील, रविराज परदेशी, सुनील भामरे, प्रशांत चौधरी यांनी उपक्रमाचे आयोजन केले.