चाळीसगावात साडेचार लाखासाठी विवाहीतेचा छळ

0

उतराण येथील व सासरकडील ८ जणांवर गुन्हा
चाळीसगाव – मोटारसायकल घेण्यासाठी व कर्ज फेडण्यासाठी माहेरुन ४ लाख ७० रुपये आणावेत म्हणुन विवाहीतेस उपाशी पोटी घरात डांबुन ठेवुन मारहाण करुन शारिरीक मानसिक छळ करुन व प्रोत्साहन दिल्याप्रकरणी एरंडोल तालुक्यातील पती, सासुसह इतर ८ जणांवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मालेगाव रोड सावली हॉटेल शेजारील (चाळीसगाव) माहेर असलेल्या आश्विनी दिपक पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मोटारसायकल घेण्यासाठी व कर्ज फेडण्यासाठी त्यांचे पती दिपक अशोक पाटील, सासु ग भा रंजनाबाई अशोक पाटील दोघे रा. उतराण ता. एरंडोल व लक्ष्मी अनिल जवरे, अनिल बाबुराव जवरे दोघे रा. इंद्रायणी कॉलनी करगाव रोड चाळीसगाव, माया मोहन पाटील, मोहन आण्णा पाटील रा. जुना गाव टाकळी प्र.चा.ता. चाळीसगाव, छाया शरद खैरनार, शरद उत्तम खैरनार रा महाराणा प्रताप चौक सिडको नाशिक यांनी ५ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांचे लग्न झाल्यापासुन ते १६ ऑक्टोबर २०१८ पावेतो सासरी व माहेरी शारीरिक मानसिक छळ केला तसेच ईतरांनी प्रोत्साहन देवुन त्यांच्या वडीलांकडे पैशांची मागणी केली तसेच आरोपी छाया शरद खैरनार यांच्या नाशिक येथील घरी उपाशी घरात डांबुन ठेवुन मारहाण करुन शारीरिक मानसीक छळ केला तसेच त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागीने व मंगळसूत्र बळजबरीने काढुन घेवुन माहेरी सोडुन दिल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला वरील ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास हवालदार राजेंद्र चौधरी करीत आहेत.