चाळीसगावात सावकारीच्या वादातून एकावर गोळीबार

0

चाळीसगाव- शहरातील नागद रोड परीसरातील राकेश वाईन शॉपसमोर बुधवार, 11 रोजी कृष्णा अविनाश जाधव (24, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, चाळीसगाव) या तरुणावर पैशांच्या वादातून संशयीत आरोपी संभाजी देशमुख याने गावठी कट्ट्यातून तीन गोळ्या झाडल्याची घटना घडली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी ठेचली न गेल्यास या घटनेचा मोठा भडका उडण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, कृष्णा जाधवचीप्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्या छातीवर, पाठीवर तसेच बरगडीजवळ गोळी शिरली असून त्यांच्यावर शहरातील देवरे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चाळीसगाव पेालीस ठाण्यात आरोपीविरुद्ध आर्म अ‍ॅक्ट व अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपअधीक्षक नजीर शेख करीत आहेत.