जागोजागी फलकातून जनजागृती , आढावा बैठकीत कार्यकर्त्यांवर जबाबदारी
चाळीसगाव- देशात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या नावाने घेतला जाणारा सी एम चषक कला क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला असून हा कला क्रीडा महोत्सव तालुक्यात मोठ्या प्रमाणात होण्यासाठी आमदार उन्मेश पाटील यांच्याकडून जनजागृती करण्यात येत असून 25 हजार पेक्षा अधिक युवक-युवतींनी यामध्ये सहभाग या दृष्टीने जोरदार तयारी सुरू आहे शहर व तालुक्यात जागोजागी माहितीचे फलक लावण्यात आले आहेत तसेच आज भाजप ने आढावा बैठक घेऊन ही स्पर्धा भव्यदिव्य व्हावी यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे
विविध स्पर्धांमुळे उत्सुकता वाढली
या कला क्रीडा महोत्सवात विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थी युवक युवती यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी सर्व वयोगटातील मुलांसाठी मुलींसाठी स्वतंत्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे यात आयुष्यमान भारत क्रिकेट स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा ,व्हॉलीबॉल स्पर्धा, कुस्ती, कबड्डी, खो-खो ,कॅरम, हँडबॉल ,नृत्य स्पर्धा ,चित्रकला, रांगोळी स्पर्धा, गायन स्पर्धा ,धावण्याची स्पर्धा यासारख्या विविध स्पर्धांच्या साठी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहेता तालुक्यात सुमारे पंचवीस हजार पेक्षा अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी युवक-युवती यात सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोफत ऑनलाईन नोंदणी करण्यात येत आहे.
भाजपाकडून आढावा बैठक
सी.एम.चषक आयोजन नीटनेटके व आकर्षक व्हावे यासाठी आमदार उन्मेष पाटील यांचे उपस्थितीत भारतीय जनता पक्षाची महत्वपूर्ण बैठक आज सोमवार रोजी रात्री उशिरा आयोजित करण्यात आली आहे .भाजपा चाळीसगाव शहर व ग्रामीणची कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक भडगाव रोड वरील उमंग डि.एड कॉलेज,भूषण मंगल कार्यालय याठिकाणी आयोजित केली होती या बैठकीस उन्मेष पाटील ,तालूकाध्यक्ष के.बी.दादा साळुंखे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वरतात्या पाटील, नगराध्यक्षा आशालताताई विश्वास चव्हाण, गटनेते राजूआण्णा चौधरी,पंचायत समिती सभापती स्मितलताई दिनेश बोरसे,उपसभापती संजूतात्या पाटील , सी एम चषक जिल्हा संयोजक तथा भाजप युवा मोर्चा नेते कपील पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या बैठकीत स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्या साठी चर्चा होणार आहे या बैठकीस सर्व सन्माननीय नगरसेवक,जि.प. व पं.स.सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी, मंडळाचे पदाधिकारी, सर्व आघाड्या व मोर्चे यांचे अध्यक्ष, सरचिटणीस, व पदाधिकारी, सर्व गटप्रमुख, गणप्रमूख, शक्तीकेंद्रप्रमूख, बूथप्रमूख व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन सरचिटणीस प्रा.सुनील निकम,अनिल नागरे,धनंजय मांडोळे, अॅड.प्रशांत पालवे,अमोल नानकर यांनी केले आहे
व्यक्तीमत्व विकासासाठी सहभागी व्हावे -आमदार उन्मेष पाटील
सी एम चषक कला क्रीडा महोत्सव भव्यदिव्य व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे एकल व सांघिक विविध स्पर्धांच्या माध्यमातून हा जगातला आगळावेगळा कला क्रीडा महोत्सव तालुक्यात भव्यदिव्य व्हावा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या कल्पनेतून साकारलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प या स्पर्धेतून मोठ्या प्रमाणावर व्यक्तिमत्व विकास होणार असून आज-काल खेळाकडे विद्यार्थ्यांची दुर्लक्ष होत असताना या सीएम चषक स्पर्धेत 25 हजार पेक्षा अधिक विद्यार्थी यांना सहभागी करून यासाठी जोरदार तयारी सुरू आहे विद्यार्थ्यांनी देखील जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा यासाठी सर्व स्तरावरील कला क्रीडा प्रेमींनी प्रयत्नशील राहून या कला क्रीडा स्पर्धेत अधिकाधिक स्पर्धकांचा सहभाग वाढवावा युवकांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन तालुक्याचे आमदार उन्मेश पाटील यांनी केले आहे.