A great achievement of Chalisgaon rural police: village chemicals worth 152 lakhs were destroyed चाळीसगाव : चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तब्बल सव्वादोन लाखांचे गावठी दारुचे रसायन नष्ट केले. दोन लाख 11 हजार 530 रुपयांची दारु, कच्चे रसायन नष्ट करण्यात आले असून चाळीसगाव ग्रामीण पोलिसात वेगवेगळे 23 गुन्हे दाखल करण्यात आले.
यांनी केली कारवाई
चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संजय ठेंगे, एपीआय धरमसिंग सुंदरडे, एपीआय हर्षा जाधव, उपनिरीक्षक लोकेश पवार आदींच्या पथकाने वाघळी, लोणजे, गणेशपूर, हिरापूर परीसरात गणेशोत्सवाच्या काळात अवैधरीत्या सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर छापे टाकले.
कारवाईने खळबळ
23 ठिकाणी दारुच्या भट्ट्यांवर छापे टाकूण 2 लाख 11 हजार 530 रुपये किंमतीची दारु, कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. त्ता व मटका जुगारावर छापे टाकूण 8 गुन्हे दाखल करुन, त्यात 22 हजार 620 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.