चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर कांदा सांडला रस्त्यावर

0

चाळीसगाव । कांद्याने आगोदरच शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे तब्बल 3 हाजाराने कमी भाव कांद्याला मिळत आहे त्यातच शुक्रवारी दुपारच्या सुमारास येथील तहसील कार्यालयासमोर रस्त्यावर कांद्याच्या ट्रॅक्टरचे फाळके अचानक उघडल्याने कांदा रस्त्यावर पडला होता जवळच उभे असलेल्या नागरीक व पत्रकारांनी मदतीला धावून हा कांदा ट्रॅक्टर मध्ये भरला. यामुळे शेतकर्‍याला दिलासा मिळाला.

ट्रॅक्टरचे मागचे दार अचानक उघडले
शुक्रवारी दुपारच्या सुमारास शेतकरी दोन ट्रॅक्टर भरुन कांदा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना तहसील कार्यालयासमोर विरसावरकर चौकात हॉटेल आर्योपहार समोर दुपारी अचानक ट्रॅक्टरचे मागील दार उघडले त्यामुळे कांदा रस्त्यावर पडला. त्यावेळी वृत्तसंकलन करण्यासाठी तहसील आवारात उभे असलेले पत्रकार मोतीलाल अहिरे, सुनिल राजपुत, सूर्यकांत कदम, गणेश पवार, दिलीप घोरपडे, अर्जुन परदेशी, रामलाल चौधरी, मनोहर कांडेकर, मंगेश शर्मा, अशोक महाले, गणेश पाटील, नारायण परदेशी यांनी व नागरीकांनी रस्त्यावर पडलेला कांदा काही वेळातच ट्रॅक्टर मध्ये भरुन टाकला. मागील दोन महिन्यापूर्वी कांद्याला बाजार समितीच्या कांदा बाजारात 3800 रुपये क्विंटल ईतका भाव मिळाला होता मात्र आता आज कांद्याला चक्क 775 रुपये एवढा कमी भाव मिळाला असुन तब्बल 3000 हजाराने कमी भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आहे.

भाव उतरल्याने संकट
मागील काळात जो भाव मिळत होता तो लाल व पावसाळी कांदा होता त्याचे उत्पन्न कमी व तो कांदा जादा दिवस साठवण करता येत नाही त्या उलट आताचा भगवा व रांगडा कांदा बाजारात येत आहे हा कांदा जास्त दिवस साठवण करता येतो आज दिनांक 6 रोजी कांदा बाजारात जवळपास 100 वाहने कांदा दाखल झाला होता त्याचा भाव 775 रुपये क्विंटल आज होता ईतर दिवसाच्या मानाने कांद्याची आवक कमी आहे कांद्याचा भाव वाढण्याची अपेक्षा शेतकर्‍यांना असल्याने शेतकरी बाजारात कमी कांदा आणत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. केकाळी 3800 पर्यंत भाव मिळत होता मात्र आता फक्त 775 रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी भाव वाढण्याची प्रतीक्षा करीत आहेत.