चाळीसगाव तहसील शेजारुन मोटारसायकल लांबवली

0

चाळीसगाव – तालुक्यातील गणपुर येथील प्रदीप भानुदास कुमावत (३२) हे रेशन कार्डाचे काम करण्यासाठी  ४/९/२०१८ रोजी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर (एमएच १९ एम २३८८) या मोटारसायकलवर चाळीसगाव येथे आले होते त्यांनी त्यांची मोटारसायकल तहसिल कार्यालयाशेजारील पाण्याच्या टाकी जवळ दुपारी २ वाजता लावुन तहसिल कार्यालयात गेले व २-३० वाजता परत आले असता त्यादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची मोटारसायकल चोरुन नेली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोलीस नाईक संदीप तहसिलदार करीत आहेत.