चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथील शेत शिवारात गावठी भट्टीवर छापा

0

चाळीसगाव। ता लुक्यातील तळेगाव शिवारातील शेतात गावठी दारूची भट्टी असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे व पथकाने दि 2 जून 2017 रोजी छापा मारून 42 हजार 275 रुपये किमतीचे गावठी दारू तयार करण्याचे साहित्य व तयार दारू आणि कच्चे पक्के रसायन सकाळी 11:25 वाजता जागेवर नाश करून एकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यानुसार त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार प्रत्यक्ष भेट देवून ही कारवाई केली आहे. सध्या राज्यासह जिल्ह्यात दारू विक्रीला शासनाकडून बंदी करण्यात आली आहे. याचा फायदा गैर पद्धतीने दारूविक्रेते सक्रिय झाले असल्याचे परीसरातून बोलले जात आहे.

चाळीसगाव ग्रामीण पोलिसात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल
चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव शिवारातील शेतातील विहिरीजवळ अशोक धोंडीराम मोरे (55) तळेगाव ता चाळीसगाव हा इसम त्याचे शेतातील विहिरीजवळ गावठी दारू तयार करण्याची भट्टीवर गावठी दारू तयार करत असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांना मिळाल्यावरून त्यांनी त्यांचे सहकारी हवालदार मनोहर जाधव, शामकांत सोनावणे, पोलीस नाईक विनोद भोई, पो कॉ गणेश पवार, नितेश पाटील यांच्या सह 2 जून 2017 रोजी तळेगाव शिवारातील शेतात छापा मारून गावठी दारू तयार करण्याचा सामान जप्त केला.

1200 रुपये किमतीचे 50 लिटर मापाचे 2 लोखंडी बॅरल, 35 लिटरच्या लोखंडी 2 कॅन, दारू तयार करण्याचे इतर साहित्य व 4200 रुपये किमतीचे प्लास्टिक चे 6 कॅन 35 लिटरचे त्यात दारू तयार करण्याचे कच्चे रसायन आणि 36 हजार 875 रुपये किमतीचे 200 लिटरचे 25 प्लास्टिक चे बॅरल त्यात 5 हजार गावठी दारू तयार करण्याचे रसायन आदी मुद्देमाल असा एकूण 42 हजार 275 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला असून ते जागेवर नाश करण्यात आले आहे.

पोलीसांची धडक कारवाई
याप्रकरणी पोलीस नाईक विनोद भोई यांचे फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अशोक धोंडीराम मोरे याचे विरोधात महाराष्ट्र प्रोव्हिजन अ‍ॅक्ट कलम 65 (फ, ब, क, इ) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार शामकांत सोनवणे करीत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या परीसरात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची माहिती शहर ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस कर्मचार्‍यांनी दिली.