चाळीसगाव : चाळीसगाव तालुका काँग्रेस कमेटीची बैठक मंगळवार 27 रोजी पक्ष कार्यालयात झाली. यावेळी जळगाव लोकसभा समन्वयक सुकलाल महाजन, विधानसभा निरीक्षक डॉ. अनिल भामरे, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक तथा चाळीसगाव जिल्हा परीषद आणि पंचायत समितीचे निवडणुकीचे पक्ष निरीक्षक योगेंद्रसिंग पाटील यांच्या उपस्थितीत तालुका अध्यक्ष अनिल निकम यांचे अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मार्गदर्शन करतांना योगेंद्रसिंग पाटील म्हणाले की, 2017 च्या जि.प. व पं.स. च्या निवडणूकीत पक्ष स्वबळावर सर्व जागा लढवणार असून निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात येईल. तसेच पक्ष विरोधी काम करणार्यांची गय केली जाणार नाही. केंद्र सरकार व सरकारच्या चुकीच्या निर्णयांचा जनतेला अतोनात त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती दिली.
यांची होती उपस्थिती
यावेळी सुकलाल महाजन, डॉ. अनिल भामरे, ईश्वर जाधव, बाळासाहेब पाटील, प्रा. एम.एस. पाटील, आर.डी. चौधरी, अशोक खलाणे, युवराज पाटील आदिंनी मार्गदर्शन केले. बैठकीला आर्किटेक्ट धनंजय चव्हाण, अॅड. सुभाष खंडाळे, नरेंद्र पाटील, नरेंद्र साळुंखे, अॅड. वाडीलाल चव्हाण, रमेश शिंपी, नितीन सुर्यवंशी, हिरामण पवार, डॉ. फारूक, सरदार चव्हाण साहेबराव माळी, वाल्मीक चौधरी, युवराज आबा, विजय राठोड, विठ्ठल चव्हाण, आप्पा चौधरी, डॉ. प्रमोद पाटील, दिलीप पाटील आदि उपस्थित होते.